काही गोष्टीन तुम्ही निवडायच्या नसतात त्या तुम्हाला निवडतात...काही वर्षा पूर्वी हे वाक्य एकल होत आणि वाचून विसरुनही गेलेलो.
2012 साली पहिला डिजिटल कॅमेरा घेतला , घरात काही फोटोग्राफी किंवा कसल्याच कलेचा वारसा नव्हता त्यामुळे पहिल वाक्य आईच होत, ' आपल्याला काय कमी आहे ?आता काय दुकान टाकणार काय फोटोच ' कारण घरी मोठा व्यवसाय होताच पेट्रोलियम एजन्सी चा. पण ऑर्कुट वर काही फोटोग्राफर चे फोटो पहिले होते आणि तेव्हा पासून म्हणजे 2007 पासून ईच्छा होती कि एक कॅमेरा घ्यावा पण काही केल्या हिम्मत होत नसे ( आज ते आठवलं तर वाईट वाटत कि आपण सुरुवात उशिरा केली ) अश्या या सर्व वातावरणात कॅमेरा तर घेतला पण त्यातल काहीच कळत नव्हत आणि गावी कोणी नव्हतं सुद्धा कि ज्याच्या कडे ' गणेशशेठ ' ने त्याच हे ' खूळ 'घेऊन जाव. मग असच गुरू म्हणून इंटरनेट आणि youtube धावून आले त्यात पाहत वाचत एक एक गोष्ट समजत गेलो. त्यानंतर पण जेव्हा केव्हा प्रॅक्टिस करायची असे तेव्हा शेता समोरच एक तलाव होता तिथे पक्षी येत मग रोज सायंकाळी न चुकता तळ्यावर जाऊन एक एक गोष्ट अजमावून पहायला लागलो बर त्यातही कधीच सॅक किंवा कॅमेरा बॅग घेऊन जाता आलं नाही कारण परत शंभर प्रश्न मग माळव आणण्या साठी जे वायरची पिशवी असते त्यात कॅमेरा टाकून घेऊन जात.

दोन वर्षात बर्यापैकी नावही झालं मग हळू हळू नवीन नवीन ठिकाणी फिरत राहिलो त्यात मग वेळास च्या समुद्र कासवाचा फोटो नॅशनल जीओग्राफीक संकेत स्थळावर च्या एका सदरा साठी निवडण्यात आला. सर्वात अविस्मरणीय दिवस होता तो,प्रत्येक फोटोग्राफर च स्वप्न असत त्या ' पिवळ्या चौकटी ' च्या कुटुंबात जोडल्या जाण. पण हि फक्त सुरुवात होती त्या फोटो मुळे आत्मविश्वास आला आणि त्यांच्या कामाची पद्धत सुद्धा लक्षात आली. त्यानंतर मग असच जेजुरी ला गेलेलो सोमवती अमावस्याला जो भंडारा खेळतात त्याचे फोटो कैद करण्यास तिथे गेल्यावर समजल कि या पेक्ष्या दहा पट जास्त हळद कोल्हापूर पासून जवळ ' पट्टणकडोली 'ला दिवाळी नंतरच्या बिरुबाच्या जत्रेला खेळल्या जातो. मग लगेच डोक्याला काम लागल कि कुठे आहे बिरोबाच मंदिर आणि कस जायच, कधी सुरु होतो आणि संपत याची माहीत घ्यायला सुरुवात केली त्यात 10 दिवस गेले.

यात्रेच्य दिवशी जवळ जवळ 2 लाख लोकांत मी आणि माझा मित्र कॅमेरा घेऊन हजर होतो. उत्सव सुरु होण्या पूर्वीच आम्ही हळदीने माखलो होतो. त्यात मग दुपारी 2 वाजता ' फरांदे बाबा ' च्या भाकणुकिला सुरुवात झाली त्या अगोदर देशभरातून आलेल्या भक्तांनी ' फरांदे बाबाला ' वंदन करायला सुरुवात केली त्यात आज पर्यंत एकल होत त्या गजनृत्याला सूरवात केली. जे काही पहात होतो ते अफाटच होतो आणि त्यात परत जे नृत्य करत होते त्यांच्या वर होणाऱ्या खारीक -खोबरं - मेंढीच लोकर व हळदीचा वर्षांव होत. ते एवढं प्रचंड होत मी त्यात सारख डोळ्यात ,कानात नाकात जात व कॅमेर्याच्या लेन्स हळदीची भिंतच येत. पण तरीही मिळतील तसे क्षण पकडत गेलो.

त्या दिवशी मी जवळ जवळ 400 फोटो काढले त्या सर्व उत्सवाचे पण त्यात सर्वात आवडता गजनृत्याचा होता, त्यातच नॅशनल जीवोग्राफिक ची एक स्पर्धा होती ' प्रायमरी कलर्स ' म्हणून त्यात मी हा फोटो पाठवला. तो तिथे लोकांना इतका आवडला कि एडिटर स्पॉट लाईट मध्ये गेला.याचा अर्थ असा होता कि तो फोटो आता त्या जगप्रसिद्ध आणि सर्वांच्या लाडक्या नॅशनल जीओग्राफीक मॅगझिन मध्ये येणार होता.

खूप वर्षा पूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं होत कारण एडिटर स्पॉटलाईट हि खूप मोठी गोष्ट असते ज्यांना हि मॅगझिन म्हणजे बायबल वाटते. ज्या दिवशी मी आनंदाची बातमी फेसबुक वर सांगितली तेव्हा नुसता पाऊस झालेला कौतुकाचा.....आणि मी सगळ्यांचा स्वीकार करत स्वतःला सांगत होतो " it's just beginning best yet to come"