ब्रज कि होली

Updated: Apr 20, 2020


केरळ ला ओनाम असेल , बंगाल मध्ये दुर्गापूजा आणि आपल्या महाराष्ट्रात जस पंढरीची वारी व गणपती हा जीव कि प्राण असतो आपला , या सणांची वर्षभर आपण वाट पाहत राहतो तसंच काहीस होळी व रंगपंचमी आहे ब्रज ( किंवा ब्रीज ) .

ब्रज म्हणजे नंदगाव , मथुरा , गोकुळ आणि आजूबाजूचे काही गाव मिळून जो भाग आहे उत्तर प्रदेश आणि राजस्थान च्या सीमेवर . इथे गल्ली गल्लीत कृष्ण सापडतो . जवळ जवळ आठवडा भर हा उत्सव चालतो . नंदबाबा च्या नंद गावा पासून सुरु होत होत राधेच्या बरसाणा पासून रंग खेळत हे सगळे ब्रिजवासी मथुरेत याची समाप्ती करतात .

नंदगाव म्हणजे आपण जे गोकुळ म्हणतो ते . इथे नंदबाबा च मंदीर आहे .सुवातीला गायन समाज जो होळीचे पारंपारिक गीत म्हणत असतो तो जमा होतो . आणि इथून रंगाचा हा महोत्सव सुरु होतो . नंदगाव आणि शेजारचे गाव एका ठिकाणी बसून गाण्यात एकमेकांची मस्करी करत , टर उडवत चिडवत असतात आणि याला उत्तर म्हणून कि काय नंदगाव चे लोक रंगाने त्यांच्यावर पाण्याच्या , फुलांचा मार करत .जवळ जवळ दोन तास हे गायन सुरु असत . यालाही शेकडो वर्षाची परंपरा आहे . पिढ्यान पिढ्या ते गाणे आणि गोष्टी एका पिढी कडून दुसऱ्या पुढी कडे देण्यात येतात . जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल इथे आणि फोटोग्राफि करणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल कॅमेऱ्याची . कारण यात काही लोक भांग वगैरे पिलेले असतात आणि काहींना ' रंग ' चढलेला असतो म्हणून जाणून बुजून कॅमेऱ्यावर रंग फेकण्याचे प्रकार हि होत राहतात . म्हणून लेन्स ची काळजी घ्यावी लागते . बाकी रंग तर तुम्ही खेळा किंवा नका त्या पासून सुटका नाहीच . उंच टेकडी वर नंदबाबा चा मंदिर आहे तिथूनपूर्ण नंदगाव दिसत . मंदिराच्या बाहेरच गोल रिंगण करून गायनाचा कार्यक्रम होतो सुरु आणि ब्रजची होळी पण .

गेल्या काही वर्षा पासून प्रसिद्ध ठिकाणी फोटोग्राफर्सही वाढले आहेत त्याला ब्रज पण अपवाद नाही . पण इथे समजा ५०० ब्रजवासी असतील तर किमान ६०० फोटोग्राफर असतात फोटो काढायला . म्हणून कि काय वेगळा फोटो घेणे कसरतच आहे . जरतुम्ही जाणार असला तर या ठिकाणी तरी झूम लेन्स जास्त फायद्याची ठरेल ज्याने हवा तसा फोटो घेण्यास जास्त गर्दीत न जाता फोटोघेता येतो . नाही तरी इथे सर्वात जास्त दिल्ली आणि बंगाली फोटोग्राफर आलेले असतात ते फोटो साठी हातापाईवरपण येण्यास कमी करत नाहीत .

यानंतर दुसरा दिवस सूरु होतो बरसाणा वरून . बरसाणा म्हणजे राधेचे गाव . ब्रजवासी प्रेमाने आणि श्रद्धेने राधाराणी म्हणतात . इथेही राधाच मंदीर आहे . नंदगाव मुक्काम केल्यानंतर गोपाळांची टोळी बरसाणा ला येते . इथे त्यांच स्वागत लड्डू ने होत. त्याला लड्डू मार होली पण म्हणतात . हे पण फार सुन्दर मंदिर आहे आणि नंदबाबा मंदिरा पेक्षा थोडं मोठं असल्याने फोटो पण जरा वेगळे मिळतात . इथे zoom लेन्स पेक्षा 35mm किंवा 50mm जास्त छान . कारण गायन समाजाची जुगलबंदी जी होते ती फार शिस्तीत सुरु असते इथे म्हणून पुरेसा वेळ मिळत जातो शॉट प्लॅन करायला. नंदगाव पेक्षा हे गाव पण थोड जास्तच खट्याळ आहे त्यामुळे कि काय अजूनच जास्त कस लागतो फोटो काढताना कॅमेऱ्याना वाचवण्यात पण पोर्टेट पण एवढे छान मिळतात कि मग सब माफ असत . पूर्ण दिवस जातो या गावात फोटो काढण्यात .

तिसरा दिवस उजाडतो . आणि तो पर्यत होळीचा उत्साह पण शिगेला असतो . इथेच आणि याच वेळी सुरु होते जगप्रसिद्द ' लठमार होळी ' . याला पौराणिक कारण अस होत कि कृष्ण आणी गोपाळ जेव्हा बरसाणा येत तेव्हा पहिल्या दिवशी फुलांनी आणि मिठाईंने स्वागत होत पण नंतर हे जाण्याच नावच घेत नाहीत तिथून आणी गोपाळ तिथल्या गवळणींची छेड छाड सुरु करतात . त्याला वैतागून मग गवळणी काठी हातात घेतात . तिथून सूरु झाली लठमार ची प्रथा . हे कव्हर करायला कुठून कुठून मीडिया आणी फोटोग्राफर येतात . फोटोच्या दृष्टीने पण खूपच ड्रामा मिळतो . फक्त इथेही तेच कोणी रंग टाकणार नाही पण चुकून एखादी काठी लेन्स वर येऊ शकतेच .

इथे गल्ली बोळात छोट्या छोट्या ग्रुप ने लठमार सुरु असते . एक प्रकारच मेडिटेशन किंवा वर्ष भराचा राग काढल्या सारखंच आहे हे . कारण एवढ्या जोरात गवळणी बडवत असतात आपल्यालाच भीती वाटते . पण गोपाळ पण कमी नसतात नंदगावचे त्यांच्या लाठ्या , हाताने तयार केलेल्या कापडी ढालीवर झेलत त्यांना चिडवणं सुरूच असत . हसत खेळत हा दिवसही संपतो आणि मग हे गोपाळ निघतात कंस मामाच्या मथुरेत धुमाकूळ घालायला .

अशी हि ब्रज ची होळी . पण यात एक हळवी किनार पण आहे म्हणजे या सगळ्या भागातल्या आश्रमात सोडलेल्या विधवा आणि त्यांच आयुष्य . त्यांना या रंगात कुठेच स्थान नसत .सगळं ब्रज रंगाने रंगलेलं असताना या आपल्या पांढऱ्या साड्यात कुठे तरी दूर बसून हे सगळं पाहत असतात .हे पण शेकडो वर्षापासून सुरु आहे पण याला तडा देण्यास म्हणून काही वर्षा पासून यांच्या साठी एक दिवस वेगळी होळी खेळल्या जाते . फुलांची होळी . रंग न वापरता फुलाने खेळल्या जाणारी . मी मागच्या वर्षी हे मिस केल पण यावर्षी परत जातोय फक्त हि फुलाची होळी आणि त्यातले रंग टिपण्यास .

बघू काय होत :)

#yellow #festival #Travelphotography #street

151 views0 comments

Recent Posts

See All

#yellow