...आणि बुद्ध भेटला

Updated: Apr 20, 2020


हिमालय काय च्या काय अफाट आहे , कुठल्या तरी लांबच्या ग्रहावर आल्या सारख वाटत. तुलना नाही पण सह्याद्री फार आठवतो इथे आल्यावर.हिमालय परीक्षा घेणारा आहे मानसिक आणि शारीरिक दोन्हीहि. कल्पने पलीकडे रांगडा आणि भव्य आहे पण आपल्या सह्याद्रि सारखा मायाळू अन देखणा अजिबात नाही. अस सगळं असूनही हिमालय आठवला कि लडाख आठवत पण बाईक राईड आणि निळे आकाश या पलिकडे हिमालय अनुभवायचा असेल तर स्पिती शिवाय पर्याय नाही. पण तरीही आगस्ट मध्ये जेव्हा मी स्पितीला आलेलो तेव्हा ठरवलेल कि तेच ते डोंगर आणि निळे आकाश सोडून काही तरी वेगळ टिपूयात. वाराणशी,पुष्कर आणि वारी मुळे लोकांचे चेहरे व हावभाव टिपायच कौशल्य थोडं फार जमायला लागलेलं म्हणून स्पितीच लोक जीवन कॅमेर्यात कैद करणार होतो पण सिमल्या पासून स्पितीला येईपर्यंत अस वेगळ काही मिळाल नव्हत आणि मलाही आशा नव्हती की काही जमले आता. असच फिरत फिरत के मॉनेस्ट्री ( याला ' काई मॉनेस्ट्री ' पण म्हणतात) ला गेलेलो. कारण एक हजार वर्षे जुनी असलेल हे मठ कम प्रार्थना स्थळ लाखो फोटोग्राफर व पर्यटकांना आकर्षित करत आलेलं आहे. एवढं कि स्पिती आणि हिमाचल टुरिझम च प्रतीक आहे . त्या दिवशी तिथे फार धावपळ सुरू होती कारण पारंपरिक वेशभूषेत नाच गाण्याचा एक कार्यक्रम दोन दिवसात होणार होता. आणि त्या साठी तिथल्या तरुण लामांची तालीम सुरु होती. आणि मी जिथे हे ठरवून दिलेला नाच करत होते तिथून थोड्याच अंतरावर दोन लामा सगळ्यांन पेक्षा वेगळ आणि आपल्याच धुंदीत हिंदी नाचत होते. नंतर समजलं की ते वयाने खूपच लहान असल्याने त्यांना या कार्यक्रमात घेतले नव्हतं आणि ते तरीही त्याचा सराव पाहून स्वतःच नाचत गात होते.

आणि मी फक्त ते टिपायच काम केलं पण त्या फोटोने मला नवी ओळख मिळवून दिली. एव्हडी कि कोणाला माझे बाकीचे फोटो आठवत हि नाहीत जे मी स्पिती मध्ये काढले होते. आणि अजून काय हवं असत कलाकाराला या पेक्षा जास्त ?


484 views0 comments

Recent Posts

See All

#yellow