ब्रज कि होली

केरळ ला ओनाम असेल , बंगाल मध्ये दुर्गापूजा आणि आपल्या महाराष्ट्रात जस पंढरीची वारी व गणपती हा जीव कि प्राण असतो आपला , या सणांची वर्षभर आपण वाट पाहत राहतो तसंच काहीस होळी व रंगपंचमी आहे ब्रज ( किंवा ब्रीज ) . ब्रज म्हणजे नंदगाव , मथुरा , गोकुळ आणि आजूबाजूचे काही गाव मिळून जो भाग आहे उत्तर प्रदेश आणि राजस्थान च्या सीमेवर . इथे गल्ली गल्लीत कृष्ण सापडतो . जवळ जवळ आठवडा भर हा उत्सव चालतो . नंदबाबा च्या नंद गावा पासून सुरु होत होत राधेच्या बरसाणा पासून रंग खेळत हे सगळे ब्रिजवासी मथुरेत याची समाप्ती करतात . नंदगाव म्हणजे आपण जे गोकुळ म्हणतो ते . इथे नंदबाबा च मंदीर आहे .सुवातीला गायन समाज जो होळीचे पारंपारिक गीत म्हणत असतो तो जमा होतो . आणि इथून रंगाचा हा महोत्सव सुरु होतो . नंदगाव आणि शेजारचे