#yellow

काही गोष्टीन तुम्ही निवडायच्या नसतात त्या तुम्हाला निवडतात...काही वर्षा पूर्वी हे वाक्य एकल होत आणि वाचून विसरुनही गेलेलो. 2012 साली पहिला डिजिटल कॅमेरा घेतला , घरात काही फोटोग्राफी किंवा कसल्याच कलेचा वारसा नव्हता त्यामुळे पहिल वाक्य आईच होत, ' आपल्याला काय कमी आहे ?आता काय दुकान टाकणार काय फोटोच ' कारण घरी मोठा व्यवसाय होताच पेट्रोलियम एजन्सी चा. पण ऑर्कुट वर काही फोटोग्राफर चे फोटो पहिले होते आणि तेव्हा पासून म्हणजे 2007 पासून ईच्छा होती कि एक कॅमेरा घ्यावा पण काही केल्या हिम्मत होत नसे ( आज ते आठवलं तर वाईट वाटत कि आपण सुरुवात उशिरा केली ) अश्या या सर्व वातावरणात कॅमेरा तर घेतला पण त्यातल काहीच कळत नव्हत आणि गावी कोणी नव्हतं सुद्धा कि ज्याच्या कडे ' गणेशशेठ ' ने त्याच हे ' खूळ 'घेऊन जाव.